Gayatri Datar: अख्खं जग पालथं घातलंय, ड्रोन फोटोग्राफीत माहिर; असा आहे गायत्री दातारचा होणारा जोडीदार

IIT बॉम्बे शिक्षण घेतलेल्या श्रीकांतसोबतचा तिचा रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Gayatri Datar: अख्खं जग पालथं घातलंय, ड्रोन फोटोग्राफीत माहिर; असा आहे गायत्री दातारचा होणारा जोडीदार

मुंबई: ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री गायत्री दातार हिने अखेर आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवली आहे. गेल्या काही दिवसांपासून तीच्या साखरपुड्याच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेल्या गायत्रीने ख्रिसमसच्या मुहूर्तावर आपल्या होणाऱ्या पतीचा चेहरा जगासमोर आणला असून सोशल मीडियावर सध्या या जोडीचीच चर्चा रंगली आहे.

कोण आहे गायत्रीचा ‘सांता’?

गायत्रीने सोशल मीडियावर एक अतिशय सुंदर आणि रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिचा होणारा पती श्रीकांत चव्हरे याच्यासोबत समुद्रकिनारी मनसोक्त फिरताना दिसत आहे. “माझा कायमचा सांता मिळाला” (Meet my Forever Santa) असे प्रेमळ कॅप्शन देत तिने श्रीकांतची ओळख करून दिली आहे. या व्हिडिओमध्ये गुलाबी साडीत नटलेली गायत्री आणि फॉर्मल पोशाखातील श्रीकांत यांची केमिस्ट्री चाहत्यांना भुरळ घालत आहे.

अभिनय आणि बुद्धिमत्तेचा अनोखा संगम

गायत्रीचा होणारा नवरा श्रीकांत चव्हरे हा ग्लॅमर विश्वातील नसला, तरी त्याची ओळख अत्यंत प्रभावी आहे. श्रीकांतने देशातील नामांकित अशा IIT बॉम्बे मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनयाच्या क्षेत्रातील गायत्री आणि तांत्रिक क्षेत्रातील दिग्गज असलेला श्रीकांत यांची जोडी म्हणजे ‘ब्युटी विथ ब्रेन’चा अनोखा संगम मानला जात आहे.

हेही वाचा: Year Ender 2025 : 2025 मधील नव्या आयुष्याची सुरुवात करणारे मराठी नवविवाहित सेलिब्रिटी जोडपे जाणून घ्या

भटकंतीची आवड आणि ड्रोन फोटोग्राफीचा छंद

श्रीकांत हा केवळ अभ्यासातच हुशार नाही, तर तो एक उत्तम डिजिटल क्रिएटर आणि ड्रोन फोटोग्राफर देखील आहे. त्याला वाइल्डलाईफ फोटोग्राफीची आणि फिरण्याची प्रचंड आवड आहे. श्रीकांतने आतापर्यंत जपान, अमेरिका, व्हिएतनाम, केनिया आणि कोलंबिया यांसारख्या अनेक देशांची सफर केली आहे. त्याचे हे फिरण्याचे वेड आणि फोटोग्राफीतील कसब त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून स्पष्टपणे दिसून येते.

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

गायत्रीने गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर तिचा होणारा पती कोण असेल, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता श्रीकांतचा चेहरा समोर आल्यावर चाहत्यांनी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सहकलाकारांनी या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 2025 च्या अखेरीस अनेक मराठी कलाकार विवाहबंधनात अडकले असून आता गायत्री आणि श्रीकांत लवकरच बोहल्यावर चढणार आहेत.

हेही वाचा: Year Ender 2025 : महासत्ता होण्याच्या दिशेने चीनची ऐतिहासिक झेप ! 2025 मधील ‘या’ वैज्ञानिक क्रांतीने जग थक्क

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number