शरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार!

समलिंगी मित्राबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाने धारदार शस्त्राने वार करत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुणे येथे घडली आहे. बुधवारी सकाळी सहा वाजता शुक्रवार पेठेत ही घटना घडली. याप्रकरणी तरुणास पोलिसांनी अटक केली. 46 वर्षीय व्यक्तीने खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. समलैंगिक संबंधांना मान्यता देणारा कायदा मंजुर झाल्यानंतर या प्रकारचा पुण्यातील पहिलाच […]

शरीरसुखाच्या मागणीने बेजार, समलिंगी तरुणाचा मित्रावर सुऱ्याने वार!

समलिंगी मित्राबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाने धारदार शस्त्राने वार करत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुणे येथे घडली आहे. बुधवारी सकाळी सहा वाजता शुक्रवार पेठेत ही घटना घडली. याप्रकरणी तरुणास पोलिसांनी अटक केली. 46 वर्षीय व्यक्तीने खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. समलैंगिक संबंधांना मान्यता देणारा कायदा मंजुर झाल्यानंतर या प्रकारचा पुण्यातील पहिलाच गुन्हा खडक पोलीस ठाण्यात दाखल झाला.

काय आहे हे प्रकरण?

 

46 वर्षीय फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. लग्नानंतर वीस वर्षांनी पत्नीशी संबंध बिघडल्याने ते दोघे विभक्त झाले. दरम्यान अडीच वर्षापूर्वी पाषाण सूस रस्त्यावर राहणाऱ्या एका तरुणाशी फिर्यादीची ओळख झाली.

या दोन पुरुषांमधील जवळीक वाढली आणि आरोपी तरुण आणि फिर्यादी या दोघांमध्ये समलिंगी संबंध निर्माण झाले. दोघेही फिर्यादीच्याच शुक्रवार पेठेतील घरी राहात होते.

मात्र फिर्यादी व्यावसायिक तरुणाकडे सातत्याने शरीरसुखाची मागणी करत होता.

या प्रकाराने आरोपी तरुण हैराण झाला होता. त्याने प्रतिसाद देणं कमी केलं होतं.

या गोष्टीवरून दोघांमध्ये भांडणं होऊ लागली होती.

अखेर बुधवारी सकाळी फिर्यादी झोपेत असतानाच आरोपी तरुणाने कोयत्याने त्यांच्यावर वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्‍यावर, खांद्यावर व चेहऱ्यावर वार करण्यात आले.

हल्ल्यातून बचावलेल्या फिर्यादीने खडक पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number