राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना न्यायालयाचा जबरदस्त दणका

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई   राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गणेश नाईक यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे.   सुप्रीम कोर्टानं पावणे एमआयडीसीमधील बाळखळेश्वर मंदिराची 33 एकर जागा ताब्यात घेण्याचे एमआयडीसीला आदेश दिले आहेत.   या जागेवर नाईक यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने ट्रस्ट तयार करुन मंदिर, उद्यान तयार केले आहे.   तर, दुसरीकडे सीबीडी येथे […]

राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना न्यायालयाचा जबरदस्त दणका

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गणेश नाईक यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे.

 

सुप्रीम कोर्टानं पावणे एमआयडीसीमधील बाळखळेश्वर मंदिराची 33 एकर जागा ताब्यात घेण्याचे एमआयडीसीला आदेश दिले आहेत.

 

या जागेवर नाईक यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने ट्रस्ट तयार करुन मंदिर, उद्यान तयार केले आहे.

 

तर, दुसरीकडे सीबीडी येथे खाडी किनारी नाईक यांचा भाचा संतोष तांडेलच्या नावाने जागा घेऊन, अनधिकृत ग्लास हाऊस उभारले होते. या दोन्ही ठिकाणच्या जागेसंदर्भातील हायकोर्टाने

दिलेल्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून संतोष तांडेल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

मात्र, न्यायालयाने तांडेल यांची ही मागणी फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एमआयडीसी आपली जागा ताब्यात घेवू शकते. तर सीबीडीमध्ये ग्लास हाऊसच्या जागेवर

सिडकोच्या माध्यमातून होणारे मरीना सेंटरचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number