छोट्या पुढारीला गौतमीचं उत्तर

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या भरगच्च कार्यक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असते. गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंच आहे. गौतमी पाटीलचा प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल्लच असतो. त्यामुळे तिची चर्चा होतेच. मात्र, सध्या गौतमी वेगळ्याच अडचणीत सापडली आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर महाराष्ट्रात बंदी घालावी अशी मागणी नेहमीच विरोधकांकडून केली जाते. अशात राज्यातील छोटा पुढारी म्हणून नावारूपाला आलेला घनश्याम […]

छोट्या पुढारीला गौतमीचं उत्तर

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या भरगच्च कार्यक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असते. गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंच आहे. गौतमी पाटीलचा प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल्लच असतो. त्यामुळे तिची चर्चा होतेच. मात्र, सध्या गौतमी वेगळ्याच अडचणीत सापडली आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर महाराष्ट्रात बंदी घालावी अशी मागणी नेहमीच विरोधकांकडून केली जाते. अशात राज्यातील छोटा पुढारी म्हणून नावारूपाला आलेला घनश्याम दराडे याने आज पुन्हा गौतमी पाटीलवर निशाणा साधला आहे. गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करू नये, आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा छोटा पुढारी घनश्याम दराडेने दिला आहे.

यावरच आता गौतमीने प्रत्युत्तर दिलं आहे. ती म्हणाली आहे की, ”मी महाराष्ट्राचा बिहार करतेय असा काही लोक चुकीचा आरोप करत आहेत, उलट मी महाराष्ट्राची लोक संस्कृती गावागावात पोचविण्याचे चांगल्या प्रकारे काम करत आहे. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?, असा सवाल गौतमी पाटील हिने केला.

घनश्याम दराडे माध्यमांशी बोलतांना म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे बाई वाचवणारे होते नाचवणारे नव्हते हे तरुणांनी लक्षात घ्यायला हवे. छोटा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतो की, वाकडेतिकडे चाळे करून तुम्ही डान्स केला तर येणाऱ्या पिढीवर काय संस्कार होतील? नव्या पिढीला वाटेल की असे वाकडेतिकडे चाळे करून डान्स केला तर फार फेमस होते. त्यामुळे नवी पिढी त्याकडे आकर्षित होईल आणि त्याप्रमाणे वागेल” असेही दराडे यांनी पत्रकरांशी बोलतांना सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number