Gauri Avahan 2026: आज राज्यभरात गौरींचे थाटामाटात यजमानांच्या घरात आगमन! कुठे खरेदी सुरू तर काही ठिकाणी यात्रेचे आयोजन

आज गौराईचे आगमन होणार आहे. सर्वत्र प्रसन्न वातावरण असून गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे. गौरी आवाहन दिवशी देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे, तर काही ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आरत्या, भजन

Gauri Avahan 2026: आज राज्यभरात गौरींचे थाटामाटात यजमानांच्या घरात आगमन! कुठे खरेदी सुरू तर काही ठिकाणी यात्रेचे आयोजन

आज गौराईचे आगमन होणार आहे. सर्वत्र प्रसन्न वातावरण असून गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे. गौरी आवाहन दिवशी देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे, तर काही ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आरत्या, भजन, कीर्तनाने परिसर भक्तिमय झाला आहे. 

विदर्भाचा बाजार फुलला – 
अमरावती शहरातील मूर्तीकारांकडे विविध आकारातील धातू, माती, फायबरच्या महालक्ष्मींच्या मूर्तींची खरेदी सुरू आहे. गौरींच्या सजावटीसाठी आवश्यक साहित्य, फायबर व पीओपीचे मुखवटे यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.महालक्ष्मींच्या मूर्तीची किंमत 5,000 रुपयांपासून ते 35,000 रुपयांपर्यंत आहे. यात थोरली व धाकटी महालक्ष्मीचा समावेश असतो. बाजारात पूर्णाकृती मूर्ती, पारंपरिक दागिने, रेडीमेड साड्या, विविध सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे.पीओपीच्या गौरींचे सेट 400 ते 5,000 रुपयांपर्यंत आहेत. किंमत अधिक असतानाही फायबरच्या पूर्णाकृती सेटची मागणी वाढली आहे. टिकाऊपणा आणि आकर्षक सजावटीमुळे ग्राहक फायबरला पसंती देत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत काही साहित्याचे दर स्थिर आहेत, तर काही साहित्याच्या किंमतीत सुमारे 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. बाजारात 1,500 ते 9,000 रुपयांपर्यंत विविध आकारांचे मुखवटे उपलब्ध आहेत.

हेही वाचा – Gauri Avahan 2026: गौरी आवाहन, गौरी पूजन म्हणजे काय? शुभ मुहूर्त, पूजेची विधी आणि गौरीचा नैवेद्य जाणून घ्या..

अकोल्यात यात्रेची लगबग- 
अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यातल्या पणज येथे बोर्डी नदीच्या काठावर वसलेले 'श्री महालक्ष्मी माता मंदिर' हे राज्यातील एकमेव प्रसिद्ध आणि जागृत स्थान आहे. दरवर्षी गौरी पूजनानिमित्त येथे गावकऱ्यांच्या वतीने 3 दिवस भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. आजपासून या यात्रेला सुरुवात झाली असून हजारो भाविक दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.

सांगलीत महिलांचा उत्साह- 
गौरी गणपतीचा उत्साह महिलांमध्ये मोठा असतो. आज सकाळपासून सांगलीच्या कृष्णा नदीच्या काठावर गौराईच्या पूजनासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. कृष्णा नदीच्या पाण्याने भरलेली घागर आणि गौराई घेऊन महिला घराकडे जात होत्या. घरोघरी प्रतिष्ठापनेनंतर अंगणात गौराईचे खेळ खेळले जातात. आगमनाने आनंदित झालेल्या सुवासिनींनी नदीकाठावरच झिम्मा-फुगडीचा फेर धरला आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात गौराईची प्रतिष्ठापना केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number