गणरायापाठोपाठ गौराईचं जल्लोषात आगमन…

कोकणासह राज्यभरात सर्वत्र गौराईचं जल्लोषात आगमन होत आहे. भाद्रपद महिन्याच्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं. कोकणातील अनेक गावागावात आजही पारंपरिक पद्धतीनं रितीरिवाज पाळत गौराईला घरी आणले जाते. सुहासिनी खड्यांची,पानांची तर गौरीचे मुखवटे आणून त्यांची पूजा करतात, गौरी आणण्यासाठी विहिरी, नद्या तसंच पाणवठयावर सुवासिनी आणि मुलींनी गर्दी केली होती. नदीच्या किनाऱ्यावरील तेरड्याची पाने आणि खडे घेऊन […]

गणरायापाठोपाठ गौराईचं जल्लोषात आगमन…

कोकणासह राज्यभरात सर्वत्र गौराईचं जल्लोषात आगमन होत आहे. भाद्रपद महिन्याच्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं.

कोकणातील अनेक गावागावात आजही पारंपरिक पद्धतीनं रितीरिवाज पाळत गौराईला घरी आणले जाते.

सुहासिनी खड्यांची,पानांची तर गौरीचे मुखवटे आणून त्यांची पूजा करतात, गौरी आणण्यासाठी विहिरी, नद्या तसंच पाणवठयावर सुवासिनी आणि मुलींनी गर्दी केली होती.

नदीच्या किनाऱ्यावरील तेरड्याची पाने आणि खडे घेऊन त्याची पूजा करण्यात येते.

सांगलीमध्येही वाजत गाजत सुवासिनी महिलांनी गौराईचे स्वागत केले. यावेळी गौराईच्या आगमनाने भाराऊन गेलेल्या सुवासिनींनी चक्क झिम्मा फुगड्यांचा फेर धरीत गौराईचे स्वागत केले.

गौराईच्या आगमनासाठी आणि गौरी पूजनासाठी महिलांनी कृष्णा नदी घाटावर गर्दी केली होती.

पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हटले जाते. महालक्ष्मींचा हा सण तीन दिवस घरोघरी साजरा होणार आहे.

पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीपूजन व तिसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी-महालक्ष्मींचे विसर्जन होईल. 

 तीन दिवस अगदी आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असताना तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन होणार असल्यामुळे मात्र काहीशी दु:खाची छाया असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number