श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी दर्ष अमावस्या, आषाढी अमावस्या परंतु समाजात प्रचलीत गटारी अमावस्या या दिवशी मांसाहार, मद्य प्राशन करुन हा दिवस साजरा करीत असतानाच विद्यार्थी भारती या विद्यार्थी संघटनेतर्फे युवकांमधील भुताखेताची भिती निघून जावी तसेत बाबागीरीबाबत असलेल्या अंधश्रद्धा दुर व्हाव्यात या उद्देशाने स्मशानभुमीत भुता भुता ये ये असे आवाहन करीत एक रात्र भुताची हा आगळा वेगळा कार्यक्रम स्मशानभूमीत साजरा केला आहे .
अमावस्येच्या रात्री स्मशानात जाऊ नये असं म्हणलं जात. त्यामुळे अमावस्येच्या रात्रीच स्मशानात जाऊन पूर्ण रात्र तेथे काढणार आणि भुतांनी आम्हाला भेटायला याव या उद्देशाने अशी गटारी साजरी करण्यात आली आहे.
.याठिकाणी ‘भुता भुता ये रे आम्ही तुम्हाला भेटायला आलोय रे ‘ अशा मुलांनी तयार केलेल्या गाण्यां मार्फत भुताना आव्हान केलं आहे.
भिवंडी तालुक्यातील नांदकर बापगाव येथील स्मशानभूमीत हा कार्यक्रम साजरा करीत असताना स्मशानभूमीत भुत प्रेत बुवाबाजी बाबागीरी भोंदूगिरी कशी समाजात पसरविली जाते.
या ठिकाणी पथनाट्यातुन सादरीकरण केले, तर प्रबोधनात्मक गीते सादर करुन भुतांना आवाहन करीत हा आनंद मध्यरात्री साजरा केला.
अनेक विद्यार्थी भीती घेऊन येतात आणि निर्भय होऊन जातात. वेगवेगळ्या खेळांमार्फत अंधश्रद्धेची पोलखोल केली जाते. ज्यामध्ये असंख्य महाविद्यालयीन युवक युवती पालक सहभागी झाले होते.
” एक रात्र भुतांची ” या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी भारती या संघटनेच्या माध्यमातून मागील पाच वर्षां पासुन विविध गावातील स्मशान भूमीत साजरा केले जात आहे.