Gas Tanker Accident : मुंबई–अहमदाबाद महामार्गावर गॅस टँकर पलटी; कार्बन डाय-ऑक्साइड वायूची गळती सुरू झाली अन्…

मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी परिसरात गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा टँकर महामार्गापासून अवघ्या वीस फूट अंतरावर जाऊन पलटी झाला.

Gas Tanker Accident : मुंबई–अहमदाबाद महामार्गावर गॅस टँकर पलटी; कार्बन डाय-ऑक्साइड वायूची गळती सुरू झाली अन्…

मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी परिसरात गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा टँकर महामार्गापासून अवघ्या वीस फूट अंतरावर जाऊन पलटी झाला. अपघातानंतर टँकरमधून कार्बन डाय-ऑक्साइड वायूची गळती सुरू झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ज्यामुळे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यावेळी टँकरमधून होणाऱ्या वायू गळतीमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा- Road Accident: अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; पिकअप आणि ट्रकच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू, 15 हून अधिक जखमी  

पिली नदी पुलावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
अमरावतीच्या परतवाडा–चांदूरबाजार मार्गावरील पिली नदीच्या पुलावर  भीषण अपघात , वीटवाहू ट्रक पुलावरील संरक्षक कठडे तोडत थेट नदीपात्रात कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर ट्रकखाली चार जण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक, ॲम्ब्युलन्स सेवा तसेच जेसीबीसह संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. ट्रकखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number