युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण देशभरात गॅस सिलेंडरचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे. अशातच शासनाने गॅस सिलेंडरच्या नियमावली कठोर बदल केल्याने व्यवसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच धुळ्यातील राहुल कुलकर्णी यांनी आपल्या संकल्पनेतून बायोमास इंधनाचा पर्याय निर्माण केला असून सध्या त्यांच्या या अत्याधुनिक पद्धतीच्या इंधनाला चांगलीच मागणी वाढली आहे.
हेही वाचा- Mumbai AC Local: सीएसएमटी-कल्याण प्रवाशांना दिलासा; AC लोकलच्या फेऱ्यांमध्ये होणार वाढ
युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा प्रश्न हा अधिक बिकट झाल्याने व्यवसायिकांना आपले हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली असून सर्वसामान नागरिकांना देखील घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अशातच धुळ्यातील एमआयडीसीत असलेले राहुल कुलकर्णी यांनी आपल्या संकल्पनेतून बायोमास इंधनाची निर्मिती केली असून शेतातील वाया जाणारा पालापाचोळा तसेच धान्याचे टाकाऊ मटेरियल यांचा वापर करून बायोमास त्यांनी तयार केला. यावेळी अत्याधुनिक पद्धतीची एक शेगडी देखील राहुल कुलकर्णी यांनी तयार केली आहे. या शेगडीत तयार करण्यात आलेले वाया जाणाऱ्या पालापाचोळा तसेच शेतातील भांड्यांच्या टाकाऊ वस्तु पासून तयार करण्यात आलेले लाकूड टाकून ही शेगडी प्रज्वलित केली जाते. यातून हॉटेल व्यवसायिक तसेच घरगुती अन्नपदार्थ तयार करण्यासाठी अत्यंत कमी खर्चात इंधन उपलब्ध होत असल्याने या बायोमासला नागरिकांची प्रचंड मागणी वाढली आहे. धुळे शहर आणि जिल्हा सह इतर जिल्ह्यातून देखील याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याची माहिती राहुल कुलकर्णी यांनी दिली आहे.
राहुल कुलकर्णी म्हणाले की, हॉटेल व्यवसायासाठी या इंधनाचा वापर केल्यास गॅसच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चात हे इंधन उपलब्ध होत असून प्रदूषण देखील होत नसल्याची माहिती हॉटेल व्यवसायिकांनी दिली आहे जास्तीत जास्त हॉटेल व्यवसायिकांनी तसेच घरगुती वापरासाठी नागरिकांनी हे इंधन वापरण्याचे आवाहन देखील हॉटेल व्यवसायिकांनी केले आहे…