Pune Crime News : पुण्यात टोळीयुद्ध! आंदेकरच्या खूनाचा बदला?, भररस्त्यात आरोपीच्या भावाला गोळ्या घातल्या; प्रत्यक्षदर्शी म्हणाले…

पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्ध उफाळून आल्याचे पाहायला मिळाले.

Pune Crime News : पुण्यात टोळीयुद्ध! आंदेकरच्या खूनाचा बदला?, भररस्त्यात आरोपीच्या भावाला गोळ्या घातल्या; प्रत्यक्षदर्शी म्हणाले…

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्ध उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येतील आरोपीच्या भावाला भररस्त्यात गोळ्या खालून संपवल्याची थरारक घटना घडली आहे. पुण्यातील बालाजीनगर परिसरात एका तरूणावर गोळ्या झाडून संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कोमकर आणि आंदेकर टोळीयुद्धातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या  करण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते. आंदेकर टोळीतील व्यक्तींनी हा गोळीबार केल्याची माहिती आहे. कोमकर आणि आंदेकर टोळीयुद्धातून ही चौथी हत्या झाल्याचं समोर आलं आहे. पुणे-सातारा रस्त्यावर आज, बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भरदिवसा थरारक गोळीबार झाला. अक्षय उर्फ बाळा मस्के (वय 26) असे गोळीबार झालेल्या इसमाचे नाव आहे.

दोन वर्षांपूर्वी वनराज आंदेकर यांची भरचौकात हत्या करण्यात आली होती. पुण्यातील नाना पेठ येथील डोके तालमी समोर वनराज आंदेकर उभे असताना त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. तेव्हापासून आंदेकर टोळी या हत्येचा बदला घेण्याकरिता प्रयत्नात होते. वनराज आंदेकर यांना गोळ्या झाडल्यानंतरही त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले होते. याप्रकरणी पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि दोन मेहुण्यांना अटक केली आहे. आता वनराज आंदेकर यांच्या हत्येला दोन वर्ष उलटली आहेत. 

हेही वाचा : Ratnagiri Bomb Blast: रत्नागिरी हादरलं! जंगलात लाकूड गोळा करताना महिलेच्या हातात गावठी बॉम्बचा स्फोट; परिसरात सापडले 25 जिवंत बॉम्ब

आंदेकरच्या हत्येतील आरोपीच्या भावावर गोळीबाराची घटना घडल्यानंतर त्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या टोळी युद्धातून करण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणात प्राथमिक तपास सुरू करण्यात आला. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी थरारक घटनाक्रम सांगितला.

आंदेकर याचे कुटुंबिय सध्या तुरुंगात आहेत. त्यामध्येच पुन्हा एकदा पुण्यात टोळी युद्ध सुरू झाले. या हत्येच्या घटनेनंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच याच टोळी युद्धातून मोठा खून झाला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number