वृत्तसंस्था, नवी दिल्ली
योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचललीत तरी उत्तर प्रदेशातील महिला सुरक्षित नाही.
सोमवारी एका महिलेवर कारमध्ये बलात्कार करून कारबाहेर फेकून देण्यात आले. नोएडामध्ये ही घटना घडली.
महिला रस्त्याने जात असताना कारमध्ये असलेल्या अज्ञातांनी तिला कारमध्ये खेचलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
त्यानंतर हॉस्पिटलपासून काही अंतरावर दूर तिला फेकून ते निघून गेले. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस तपास
सुरू करण्यात आला आहे.