Ganeshotsav 2026: टाकाऊ वस्तूंना कल्पकतेची जोड, फक्त 5 हजारांत पर्यावरणपूरक बाप्पाची आरास

गणेशोत्सवात बाप्पाच्या आकर्षक मूर्तीसोबतच त्याची आरास, सजावट पाहण्याची एक वेगळीच उत्सुकता असते. मंडळातील बाप्पाबरोबरच घरगुती गणरायाची सजावट ही अनेकदा थक्क करून जाते. आगमनापूर्वीच्या 3 ते 4 दिवसांपासून

Ganeshotsav 2026: टाकाऊ वस्तूंना कल्पकतेची जोड, फक्त 5 हजारांत पर्यावरणपूरक बाप्पाची आरास

गणेशोत्सवात बाप्पाच्या आकर्षक मूर्तीसोबतच त्याची आरास, सजावट पाहण्याची एक वेगळीच उत्सुकता असते. मंडळातील बाप्पाबरोबरच घरगुती गणरायाची सजावट ही अनेकदा थक्क करून जाते. आगमनापूर्वीच्या 3 ते 4 दिवसांपासून ही लगबग सुरू असते. आर्टिफिशियल फुले, थर्माकोल, फोम शीट, रंगीत पडदे असा लवाजमा खरेदी करावा लागतो. मात्र पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त अशी सजावट खूप कमी लोक करताना दिसतात. अशीच एक नयनरम्य आरास पाहायला मिळाली आहे.

पिंपरी चिंचवडमधील मावळ तालुक्यातील निगडे गावात घरगुती गणेशोत्सवासाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा अनोखा आणि पर्यावरणपूरक देखावा साकारण्यात आला आहे. राजेश पानसरे यांनी घरातील टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून देहू ते पंढरपूरचा पायी पालखी सोहळा जिवंत करण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे.गाडीची चैन, व्हील, बेअरिंग आणि लहान मुलांच्या खेळण्यातील मोटरच्या मदतीने हलता पालखी रथ, तर लाकडी चमच्यांपासून रस्त्यावरील पथदिवे तयार करण्यात आले आहेत. जुन्या पुठ्ठ्यापासून मंदिराची प्रतिकृती, तर कापडी बाहुल्यांपासून वारकऱ्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – Gauri Avahan 2026: आज राज्यभरात गौरींचे थाटामाटात यजमानांच्या घरात आगमन! कुठे खरेदी सुरू तर काही ठिकाणी यात्रेचे आयोजन

विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा साकारण्यासाठी फक्त 5,000 रुपये खर्च आला आहे. भक्ती, वारकरी परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम असलेला हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number