अंगारकीनिमित्त गणेश भक्तांची मांदियाळी

राज्यभरात अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश भक्तांनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे. गणेश मंदिरांमध्ये यानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासह, नाशिकच्या नवश्या गणपती मंदिरात तसेच टिटवाळा गणपती मंदिरात ही आकर्षक सजावट करण्यात आली होती. नाशिक येथे द्राक्षांची आरास करून मंदिराचा गाभारा सजवण्यात आला होता. सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी अंगारकीनिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांची […]

अंगारकीनिमित्त गणेश भक्तांची मांदियाळी

राज्यभरात अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश भक्तांनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे. गणेश मंदिरांमध्ये यानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासह, नाशिकच्या नवश्या गणपती मंदिरात तसेच टिटवाळा गणपती मंदिरात ही आकर्षक सजावट करण्यात आली होती. नाशिक येथे द्राक्षांची आरास करून मंदिराचा गाभारा सजवण्यात आला होता.

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

अंगारकीनिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. या वेळी भाविकांसाठी विविध सुविधा देखील करण्यात आल्या आहेत. मुंबईतील सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी सर्व निर्बंध उठवले आहेत. दरम्यान, आज अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त रात्री दीड वाजल्यापासून भाविकांसाठी बाप्पाचं दर्शन खुले करण्यात आले आहे.

‘दगडूशेठ’ गणपतीला स्वराभिषेक

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती संस्थेच्यावतीने मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आला. अंगारकीच्या निमित्ताने ब्रम्हणस्पति सूक्त अभिषेक ,गायक निखिल महामुनी यांचा स्वराभिषेक, सकाळी ८ ते १२ आणि दुपारी२ ते ६  गणेश याग , असे विविध धार्मिक आणि  सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने मंदिराला आकर्षक सजावटीचा फुलांची आरास आणि विद्युतरोषणाई साकारली आहे.

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात द्राक्षांची आकर्षक सजावट

नवसाला पावणारा गणपती म्हणून नाशिकच्या नवश्या गणपती मंदिरात मंगळवारी अंगरिका चतुर्थी निमित्त द्राक्षांची आरास करण्यात आलीय,मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात द्राक्षांची आकर्षक सजावट करण्यात आलीय,हिरवे आणि काळया द्राक्षांनी ही सजावट करण्यात आलीय,मंदिरातील गाभार्याला ही द्राक्षांची सजावट करण्यासाठी १५१ किलो द्राक्ष वापरण्यात आलेय,चतुर्थी निमित्त हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असतात.

टिटवाळ्याच्या गणेश मंदिरात भाविकांची मांदियाळी

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष आणि भक्तांची गणेश दर्शनासाठी लागलेली रांग, असेच काहीसे चित्र मंगळवारी पहाटेपासूनच टिटवाळा येथील गणेश मंदिरात दिसत होते. कोरोनाची दोन वर्षे मंदिरे बंद होती. आता त्याचे सावट कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर येत आहे. यामुळेच अंगारकीनिमित्त गणेश मंदिरे भक्तांनी फुलून गेली आहेत.

द्विभुजा गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

कोरोनाचे निर्बंध उठल्याने अंगारकीचा योग साधत रेडी येथील द्विभुजा गणपती मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी येथील द्विभुजा गणपती एक धार्मिक पर्यटनस्थळ आहे. दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने मंदिरे बंद होती. आता मंदिरे उघडल्याने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथील भाविकांनी गणपतीचे दर्शन घेतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number