जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गणपती बाप्पाचे स्वागत आपण वाजत-गाजत केले, बाप्पाला निरोपही तसाच धुमधडाक्यात देण्यात आला. मात्र, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केल्यानंतर रस्त्यात पाडलेले खड्डे बुजवण्याची जबाबदारी पार न पाडणा-या ‘एफ दक्षिण’ विभागातील मंडळांना पालिकेने दंडाची नोटीस पाठवली आहे.
तब्बल 13 गणेशोत्सव मंडळांना दंडाची नोटीस पाठवत एकूण 12 लाख 94 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाने रस्त्यावर केलेल्या 246 खड्ड्यांसाठी 4 लाख 86 हजार रुपये तर त्या खालोखाल लालबागमधीलच ‘गणेश गल्ली मुंबईचा राजा’ मंडळाचा नंबर असून या मंडळाने 207 खड्डे खोदले आहेत. यासाठी पालिकेने त्यांना 4 लाख 14 हजार रुपये दंड आकारला असून याबाबतच्या नोटीस मंडळांना पाठविण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवादरम्यान झालेले खड्डे आणि दंड –
मंडळे खड्डे दंड
जिजामाता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 15 30,000
गणेश मंडळ, सीता नगर 16 32 हजार
गं. द. आंबेकर मार्ग (मध्य विभाग) सार्व. गणेश 14 28 हजार
परळ सार्वजनिक उत्सव मंडळ, मिठाईवाला 21 42 हजार
गणेश गल्ली सार्वजनिक गणेश मंडळ 207 4 लाख 14 हजार
अभ्युदय नगर सार्वजनिक गणेश मंडळ 12 24 हजार
राम टेकडी शिवडी 09 18 हजार
बाळ गोपाळ गणेश मंडळ, काळाचौकी 12 24 हजार
लाल मैदान, परळ 17 34 हजार
नरेपार्क, परळ 23 46 हजार
बाळगोपाळ, करीरोड 24 48 हजार
चिंचपोकळी, 34 68 हजार
लालबागचा राजा 246 4 लाख 86 हजार