सणावाराला आपल्या घरी गोड-धोडाचे पदार्थ बनवतात. पण गोड खाऊन वजन वाढते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी शुगर फ्री मोदक घेऊन आलोय. जेणेकरून मधूमेह असलेल्यांसाठी हा मोदक आरोग्यास उपयुक्त आहे. साहित्य: – खजूर – 1 कप (बारीक केलेले) मावा – 1 कप ड्रायफ्रूट (काजू, बदाम, किसमिस) किसलेलं खोबरं – 1 कप तूप – ½ चमचा कृती:- […]
सणावाराला आपल्या घरी गोड-धोडाचे पदार्थ बनवतात. पण गोड खाऊन वजन वाढते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी शुगर फ्री मोदक घेऊन आलोय. जेणेकरून मधूमेह असलेल्यांसाठी हा मोदक आरोग्यास उपयुक्त आहे.
साहित्य: –
खजूर – 1 कप (बारीक केलेले)
मावा – 1 कप ड्रायफ्रूट (काजू, बदाम, किसमिस)
किसलेलं खोबरं – 1 कप
तूप – ½ चमचा
कृती:-
प्रथम एका कढईत तूप टाका. नंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून ते लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
नंतर ते मिश्रण मिक्सरमध्ये टाकून बारीक करा.
त्याच तव्यावर खजूर घालून ते मिश्रण गरम करून, खजूर बारीक करून घ्या.
त्यानंतर खोबऱ्याचा किस टाकून सर्व मिश्रण एकजीव करा.
गॅस बंद करा. ते मिश्रण थंड होऊ दया.
मिश्रण थंड झाल्यावर ते मोदकाच्या साच्यात भरून मोदक बनवा.