कुणी मुलगी देता मुलगी; ग्रामीण भागातील तरुणांची लग्न रखडली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कुणी मुलगी देता मुलगी.. ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांवर सध्या हीच वेळ ओढावली आहे.   एकीकडे दुष्काळाची झुंजत असताना शेती करणाऱ्या तरुणांची लग्नही रखडल्याचं भीषण वास्तव समोर आले.   यामुळे कुटुंब व्यवस्थाच उद्ध्वस्त होत असल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. शेतीमालाला भाव नाही, कर्जमाफी होत नाही.   अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. […]

कुणी मुलगी देता मुलगी; ग्रामीण भागातील तरुणांची लग्न रखडली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कुणी मुलगी देता मुलगी.. ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांवर सध्या हीच वेळ ओढावली आहे.

 

एकीकडे दुष्काळाची झुंजत असताना शेती करणाऱ्या तरुणांची लग्नही रखडल्याचं भीषण वास्तव समोर आले.

 

यामुळे कुटुंब व्यवस्थाच उद्ध्वस्त होत असल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. शेतीमालाला भाव नाही, कर्जमाफी होत नाही.

 

अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. पण तरुण शेतकऱ्यांना मात्र याची सर्वात जास्त झळ बसली.

 

अहमदनगर जिल्ह्यातील 45 गावांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात 3 हजारांपेक्षा जास्त तरुण अविवाहित राहिल्याचे आकडेवारीतून समोर आले.

 

शेती करणाऱ्या तरुणांपेक्षा शहरातल्या नोकरदार तरुणांना मुली प्राधान्य देतात. मुलीचे लग्न शेतकरी मुलाशी करायचं नाही ही मानसिकताही मुलीच्या आईवडिलांमध्ये

दिसते.

 

अनेक तरुण त्यामुळे लग्नासाठी नोकरीची धडपड करतात. लग्नच होत नसल्याने अनेक तरुण नैराश्येतून व्यसनांकडे वळल्याचं भयानक वास्तवही दिसून येते.

 

नगर जिल्ह्यात अकोले आणि संगमनेर तालुक्यात सर्वेक्षण

 

– 25 ते 30 वयोगटात 2294 तरुणांचे विवाह रखडले

– 31 ते 40 वयोगटात 774 तरुणांचे विवाह रखडले

– MBA झालेल्या 4 तरुणांनी शेतीकडे वळल्यानं त्यांचे विवाह रखडले

– वयाची तिशी उलटलेल्या तरुणांची विवाहाची आशा सोडल्याचंही उघड

– काही गावांत विवाह रखडलेले 250 ते 300 तरुण

– अल्पभूधारकच नाही, 10 एकर जमीन असलेल्या कुटुंबातही विवाह रखडले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number