महिला दिनानिम्मित नक्षल वाद्यांचे बॅनर, संघटित होण्याचे दिले आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली गडचिरोलीतल्या कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी रस्त्यावर बॅनर बांधल्याचे दिसून आले. महिला दिनानिमित्त संघटित होण्याचं आवाहन करण्यात आलंय. हे सरकार जातीयवादी असल्याचा आरोपही करण्यात आलाय. नक्षल्यांच्या क्रांतिकारी आदिवासी महिला संघटन-दंडकारण्य, या संघटनेने ही पत्रके टाकली आहेत. 5 मार्चच्या पहाटे नक्षल्यांनी कोरची-पकनाभट्टी रस्त्यावर बॅनर लावून त्याखाली पेरुन ठेवलेल्या प्रेशर बॉम्बचा स्फोट झाला होता. यात […]

महिला दिनानिम्मित नक्षल वाद्यांचे बॅनर, संघटित होण्याचे दिले आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली

गडचिरोलीतल्या कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी रस्त्यावर बॅनर बांधल्याचे दिसून आले. महिला दिनानिमित्त संघटित होण्याचं आवाहन करण्यात आलंय. हे सरकार जातीयवादी असल्याचा आरोपही करण्यात आलाय. नक्षल्यांच्या क्रांतिकारी आदिवासी महिला संघटन-दंडकारण्य, या संघटनेने ही पत्रके टाकली आहेत.

5 मार्चच्या पहाटे नक्षल्यांनी कोरची-पकनाभट्टी रस्त्यावर बॅनर लावून त्याखाली पेरुन ठेवलेल्या प्रेशर बॉम्बचा स्फोट झाला होता. यात दोन पोलिस अधिकारी जखमी झाले होते. त्यानंतर आज अंतरगाव-पुराडा रस्त्यावर पत्रके व बॅनर आढळून आली. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ माजलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number