गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

गडचिरोली: गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया पोलीस मदत केंद्रांतर्गत जंगल परिसरात ही चकमक झाली. २२ एप्रिलच्या मध्यरात्री रात्रीच्या अंधारात पोलिसांना बाहेर येण्यास प्रवृत्त करून घातपात घडविण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा गोळीबार केला होता. इतकंच नाही तर एक हँडग्रेनेडही फेकला होता. याच पार्श्वभुमीवर पोलीस दलाने परिसरात नक्षलविरोधी शोधमोहीम राबविली होती. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या […]

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

गडचिरोली: गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया पोलीस मदत केंद्रांतर्गत जंगल परिसरात ही चकमक झाली.
२२ एप्रिलच्या मध्यरात्री रात्रीच्या अंधारात पोलिसांना बाहेर येण्यास प्रवृत्त करून घातपात घडविण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा गोळीबार केला होता. इतकंच नाही तर एक हँडग्रेनेडही फेकला होता.

याच पार्श्वभुमीवर पोलीस दलाने परिसरात नक्षलविरोधी शोधमोहीम राबविली होती. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुद गोळीबार केला. पोलिसांनी त्यास प्रत्यत्तर देत गोळीबार केला असता चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीसांना यश आले आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number