गडचिरोलीमध्ये दुचाकी झाडाला धडकली! दोन सख्ख्या भावासह तिघांचा मृत्यू

गाडी चालवणाऱ्या तरुणाचे नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकी झाडाला धडकली. या अपघातात दुचाकीवरून पडलेल्या तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला.

गडचिरोलीमध्ये दुचाकी झाडाला धडकली! दोन सख्ख्या भावासह तिघांचा मृत्यू
Edited Image

Gadchiroli Accident: गडचिरोली येथे झालेल्या रस्ते अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या मुलांचा जीव गेला त्यापैकी दोन सख्खे भाऊ होते आणि तिसरा त्यांचा मित्र होता. तिघेही 20 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. दुचाकीचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. अपघातावेळी दुचाकीवर तीन जण होते. 

झाडावर आदळताच दुचाकीने घेतला पेट – 

गाडी चालवणाऱ्या तरुणाचे नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकी झाडाला धडकली. या अपघातात दुचाकीवरून पडलेल्या तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. यापैकी दोन सख्ख्ये भाऊ वसंतपूरचे रहिवाशी असून तिसरा तरुण तेलंगणाचा रहिवासी आहे. ही टक्कर इतकी जोरदार होती की झाडावर आदळताच दुचाकीने पेट घेतला. या घटनेचे व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात दुचाकी जळताना दिसत आहे. 

हेही वाचा – बुलढाण्यात भीषण अपघात, मुंबई-नागपूर महामार्गावर बस आणि मॅटाडोरची धडक; 4 जणांचा मृत्यू

अपघातात दोन भावांचा जागीच मृत्यू – 

मृतांमध्ये सौरभ सुभाशीष चक्रवर्ती (20 वर्षे) आणि साहेब सुभाशीष चक्रवर्ती (16 वर्षे) गाव वसंतपूर, जिल्हा गडचिरोली आणि विशाल भूपाल बच्छाड (19 वर्षे), शिरपूर (तेलंगणा) यांचा समावेश आहे. या अपघातात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा तरुण विशाल याचा चामोर्शी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही टक्कर इतकी जोरदार होती की तिघेही दूर उडून पडले. तसेच दुचाकीला भीषण आग लागली. हा अपघात गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घोट ते आष्टी रस्त्यावर ठाकूरनगर येथील टेकडीच्या जवळ घडला.

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात –  

प्राप्त माहितीनुसार, हे तिनही तरुण वसंतपूरहून घोटला जात असताना ठाकूरनगर टेकडीच्या जवळील एका वळणावर त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी सागवानाच्या झाडाला धडकली. त्यापैकी कोणीही हेल्मेट घातले नव्हते. शिवाय, वेगाने येणाऱ्या दुचाकीवर तीन जण असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण होते. जर या तरुणांनी नियमांचे पालन केले असते तर ही दुर्दैवी घटना घडली नसती. 

हेही वाचा – आंध्र प्रदेशात फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग; 8 जणांचा मृत्यू

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घोट पोलिस सहाय्यता केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितेश गोहणे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा तयार केला आणि जखमी व्यक्तीला तात्काळ चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण विशाल उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चामोशी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number