काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर भंडाऱ्यात ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख या फलकांवर करण्यात केलेला असून ते बॅनर ठिकठिकाणी बघायला मिळत आहेत.
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख या फलकांवर करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती मदन रामटेके आणि युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर हे फलक लावण्यात आले आहे. लावण्यात आलेल्या या फलकांवर नाना पटोले यांच्या नावासमोर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्याचे दिसत आहे. हे सर्व फलक नाना पटोले यांच्या गावापर्यंत लावण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाना पटोले यांच्या नावाच्या आगमनाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण देखील आल्याचे पाहायला मिळत आहेत.