लग्नाची वरात नाही तर ही आहे प्रेतयात्रा; बापाच्या अंतयात्रेत बँड-बाजा लावून नाचल्या मुली

वृत्तसंस्था, नवी दिल्ली     राजधानी दिल्लीत आज एक अनोखी प्रेतयात्रा पहायाला मिळाली. बापाच्या अंतयात्रेत बँड-बाजा लावून मुलींनी डान्स केला. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  दिल्लीतील पान विक्रेता असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभाई लालवानी यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण शुक्रवारी त्यांचं निधन झालं. हरिभाई लालवानी यांना ‘गुटखा किंग’ म्हणूनही […]

लग्नाची वरात नाही तर ही आहे प्रेतयात्रा; बापाच्या अंतयात्रेत बँड-बाजा लावून नाचल्या मुली

वृत्तसंस्था, नवी दिल्ली  

 

राजधानी दिल्लीत आज एक अनोखी प्रेतयात्रा पहायाला मिळाली. बापाच्या अंतयात्रेत बँड-बाजा लावून मुलींनी डान्स केला. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

दिल्लीतील पान विक्रेता असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभाई लालवानी यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण शुक्रवारी त्यांचं निधन झालं. हरिभाई लालवानी यांना ‘गुटखा किंग’ म्हणूनही ओळखलं जातात.

लालवानी यांनी मृत्यूपूर्वी एक शेवटची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं की, “त्यांच्या मृत्यूनंतर कोणीही शोक व्यक्त करु नये. उलट त्यांच्या निधनादिवशी उत्सव साजरा करावा.”

लालवानींच्या इच्छेनुसार, मुलींनी वडिलांची अंत्ययात्रा अतिशय दणक्यात काढली. या अंत्ययात्रेसाठी बँड-बाजा लावण्यात आला होता. विशेष म्हणजे, मुलींनी यावेळी डान्स करुन वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केली.

लालवानी यांना चारही मुलींनीच खांदा दिला. तर त्यांच्या एका मुलीने मुखाग्नी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number