‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत.’ ‘शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.’ ‘गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.’ ‘औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल.’, असे ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. @PawarSpeaks हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल.… — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 9, 2023
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुझा दाभोळकर केला जाईल’ अशा स्वरूपाची धमकी ट्विटरद्वारे आणि फेसबुक पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे शिष्ट मंडळाने पोलिस आयुक्त कार्यालयात या संदर्भात पत्रही दिले आहे. पोलीस आयुक्तांनी ‘याप्रकरणी जातीने लक्ष घातले जाईल’, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांना दिले आहे.
या सर्व घटनांनंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना दिलेल्या धमकीची ट्विटरच्या माध्यमातून दखल घेतली आहे.