FSSAI Recruitment 2025: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती; 2 लाखांपेक्षा जास्त असेल पगार

पात्र आणि इच्छुक उमेदवार FSSAI च्या अधिकृत वेबसाइट fssai.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 15 एप्रिलपासून सुरू होईल आणि 30 एप्रिल 2025 रोजी संपेल.

FSSAI Recruitment 2025: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती; 2 लाखांपेक्षा जास्त असेल पगार
Edited Image

FSSAI Recruitment 2025: सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने प्रशासकीय अधिकारी यासह विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे, ज्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार FSSAI च्या अधिकृत वेबसाइट fssai.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 15 एप्रिलपासून सुरू होईल आणि 30 एप्रिल 2025 रोजी संपेल. या भरती मोहिमेअंतर्गत, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात एकूण 33 पदे भरली जातील.

रिक्त पदांची माहिती – 

संचालक: 2 पदे
सहसंचालक: 3 पदे
वरिष्ठ व्यवस्थापक: 2 पदे
व्यवस्थापक: 4 पदे
सहाय्यक संचालक: 1 पद
प्रशासकीय अधिकारी: 10 पदे
वरिष्ठ खाजगी सचिव: 4 पदे
असिस्टंट मॅनेजर: 1 पद
सहाय्यक: 6 पदे

FSSAI च्या सुचनेनुसार, ऑनलाइन अर्ज फॉर्मची हार्ड कॉपी, नियोक्ता/कॅडर कंट्रोलिंग ऑथॉरिटीने विहित नमुन्यातील प्रमाणपत्र आणि इतर सहाय्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे योग्य माध्यमाद्वारे सहाय्यक संचालक, भरती कक्ष, FSSAI मुख्यालय, 312, तिसरा मजला, FDA भवन, कोटला रोड नवी दिल्ली यांना पाठवावीत. ही कागदपत्रे 15 मे 2025 पर्यंत वरील पत्यावर पोहोचली पाहिजे.

हेही वाचा – 'ट्रम्प टॅरिफ सवलती'मुळे पुढील आठवड्यात शेअर बाजारात काय स्थिती असेल? जाणून घ्या

पात्रता – 

केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा निम-सरकारी, वैधानिक किंवा स्वायत्त संस्थेचे अधिकारी संचालक पदासाठी अर्ज करू शकतात. परंतु ते त्याच पदावर असले पाहिजेत किंवा त्यांना पालक संवर्ग किंवा विभागात वेतन पातळी 12 किंवा समकक्ष पाच वर्षांचा अनुभव असावा. याशिवाय, प्रशासन, वित्त, मानव संसाधन विकास किंवा/आणि दक्षता विभागात 15 वर्षांचा अनुभव असलेले लोक देखील यासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1,23,100 ते 2,15,900 रुपये पगार मिळेल.

हेही वाचा – गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील आठवड्यात फक्त 3 दिवसच सुरु राहणार शेअर बाजार

याशिवाय, सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा सरकारी विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा निम-सरकारी, वैधानिक किंवा स्वायत्त संस्थेत अधिकारी म्हणून 10 वर्षांचा अनुभव असावा किंवा त्याच पदावर प्रशासन, मानव संसाधन विकास किंवा दक्षता विभागात 3 वर्षांचा अनुभव असावा. तथापी, उमेदवार अधिक माहितीसाठी FSSAI ची अधिकृत वेबसाइट fssai.gov.in ला भेट देऊ शकतात.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number