नाशिक : नाफेडमार्फत कांदा खरेदीची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप नाफेडचा कोणताही अधिकारी अथवा प्रतिनिधी लासलगाव बाजार समितीत दाखल झालेला नाही. दरम्यान, बाजार समितीत जास्तीत जास्त चांगल्या कांद्याला 1700 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने अनेक शेतकरी नाफेडला कांदा विकण्यास इच्छुक नसल्याचे सांगत आहेत. चांगला बाजारभाव मिळत असताना नाफेडकडे कांदा देण्याची गरज नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नाफेडच्या खरेदी प्रक्रियेबाबत अनिश्चितता कायम असून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारातून प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी आढावा घेतला आहे.
ही ठळक वैशिष्ट्ये –
– आजपासून नाफेडकडून जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीला होणार सुरूवात
– दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट
– कांदा खरेदी केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था
– तसेच देखरेखीसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती
– 30 जूनपूर्वी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रशासनाच्या सूचना
– बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीबाबत मार्गदर्शक फलक लावण्याचे आदेश
– ग्रेडिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांना परत पाठवू नये, प्रशासनाचा इशारा
– खरेदी केंद्रांवर तक्रार नोंदवही ठेवण्याचे निर्देश
– खरेदी केलेल्या कांद्याच्या वाहतूक व मजुरीचा खर्च नाफेडकडूनच केला जाणार
– लासलगावसह निफाड, येवला, सिन्नर, चांदवड, मालेगाव, कळवण, देवळा आणि बागलाण तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा
– कांदा खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.