2025 या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. 2025 या वर्षात चित्रपटांपेक्षा जास्त चर्चा झाली ती कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याची, कामाच्या अटींची, कायदेशीर संघर्षांची आणि सोशल मीडियावरील चर्चांची. अशातच वर्षभरात बॉलीवूडमध्ये अनेक धक्कादायक घटना देखील पाहायला मिळाल्या आहेत. मनोरंजन विश्वासाठीही हे वर्ष अनपेक्षित घडामोडींचे ठरले. या वर्षी अनेक प्रमुख कलाकार, गायक, राजकारण, अध्यात्म, विज्ञान, व्यवसाय आणि क्रीडा यांसारख्या क्षेत्रातील अनेक लोकांनी आपल्याला कायमचा निरोप दिला. जाणून घेऊयात यात कोणाकोणाचा समावेश आहे ते….
यात सिनेसृष्टीतील अभिनेत्री संध्या शांताराम यांचा जन्म 13 सप्टेंबर 1936 रोजी झाला तसेच त्यांचे निधन 4 ऑक्टोबर 2025 रोजी झाले. त्यानंतर साराभाई विरुद्ध साराभाई, मैं हूं ना, आणि हम साथ साथ हैं यासारख्या चित्रपटांतून ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली असे प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांनी 25 ऑक्टोबर 2025 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांचा जन्म जन्म 25 जून 1951 रोजी झाला. तसेच बॉलीवूडमध्ये 400 हुन अधिक चित्रपट करणारे बॉलिवूडमधील दिग्गज विनोदी कलाकार गोवर्धन असरानी यांचे 20 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी निधन जाले. शोले, चुपके चुपके, नमक हराम, हेरा फेरी , धमाल , भूल भुलैया , बोल बच्चन , बॉडीगार्ड आणि खट्टा मीठा यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.
महाभारतातील कर्णाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले पंकज धीर यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1956 रोजी झाला आणि त्यांनी 15 ऑक्टोबर 2025 रोजी अखेरचाच श्वास घेतला. सोनिया और अर्जुन आणि सत्यमेव जयते सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे अभिनेते मुकुल देव यांचे निधन 23 मे 2025 रोजी झाले. सुप्रसिद्ध गाण 'कांता लगा' या गाण्यातील लिड कलाकार आणि टीव्ही अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन 27 जून 2025 रोजी झाले. भरत कुमार म्हणून ओळखले जाणारे अभिनेते मनोज कुमार यांनी 4 एप्रिल 1994 रोजी अखेरचा श्वास घेतला. क्रांती आणि रोटी कपडा और मकान या चित्रपटांनी त्यांना ओळख मिळवून दिली. अभिनेते अच्युत पोद्दार यांचे निधन 18 ऑगस्ट 2025 रोजी झाले असून त्यांनी 125 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'जो जीता वही सिकंदर' आणि 'किंग अंकल' सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे देब मुखर्जी यांचे निधन 14 मार्च 2025 रोजी झाले. उद्योगपती संजय कपूर यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1971 रोजी झाला. 12 जून 2025 रोजी त्यांचे निधन झाले.