जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजप नेते एकनाथ खडसेंविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबईच्या वाकोला पोलीस स्टेशनमध्ये खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या तक्रारीवरुन खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावमधील भाषणा दरम्यान अश्लिल शब्द वापरल्याचा आरोप दमानिया यांनी एकनाथ खडसेंवर केला आहे.
दरम्यान, बुधवारी रात्रीपासून अंजली दमानिया वाकोला पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलनासाठी बसल्या होत्या.
बुधवारी रात्री दमानिया आपल्या कार्यकर्त्यांसह वाकोला पोलीस स्थानकात पोहचून खडसेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान खडसेंविरोधात एफ आय आर दाखल करण्याची हिम्मत नसेल तर पोलिसांचा धिक्कार असो अशी जोरदार घोषणाबाजीही त्यानी केली होती.