काँग्रेसने कर्नाटकात मोफत विजेच्या केलेल्या घोषणेचा चांगलाच बोजवारा झाला आहे. एकीकडे मोफत विजेची घोषणा तर दुसरीकडे कर्नाटकात वीज युनिट सुमारे तीन रुपयाने महागणार असल्याची बातमी. त्यामुळे काँग्रेसच्या घोषणेचा अनेकांना जाच होत आहे.
सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने मोफत वीज देण्याच्या आश्वासनादरम्यान हा वाद सुरू झाला आहे. नागरिकांना २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केले आहे. भाड्याने राहणाऱ्या लोकांनाही त्याचा लाभ मिळेल. मात्र, कर्नाटकात वीज दरवाढीवरून गदारोळ सुरू आहे. कर्नाटकात जूनपासून वीज २.८९ रुपये प्रति युनिटने वाढणार आहे.
काँग्रेसने कर्नाटकात २०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली असली तरी वीज युनिट महागल्याने या घोषणेचा चांगलाच बोजवारा झाला आहे. जर कर्नाटकातील लोकांनी २०० युनिट्स स्लॅबपेक्षा जास्त खर्च केला तर त्यांना या महिन्यात प्रति युनिट २.८९ रुपये अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे. हा अतिरिक्त खर्च म्हणजे इंधन आणि वीज खरेदी खर्चाचे समायोजन आणि त्यात एप्रिलपासूनची थकबाकी याचा समावेश आहे.