दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी निःशुल्क बस सेवा

दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट उपक्रमाची बससेवा देण्यात येणार आहे. यासाठी बेस्टकडून ६०० हून अधिक बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी निःशुल्क बस सेवा

मुंबई, १८ मे २०२४, प्रतिनिधी : दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट उपक्रमाची बससेवा देण्यात येणार आहे. यासाठी बेस्टकडून ६०० हून अधिक बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सेवेसाठी मतदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नसून सध्या पूर्व व पश्चिम उपनगरांतील मतदारांसाठी बेस्ट सेवा उपलब्ध केली जाणार आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'व्होट फ्रॉम होम' मतदान सुविधा दिली आहे. मात्र, ज्या मतदारांना मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी बेस्टची सेवा दिली जाणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number