Nashik : भोंदूगिरी करणाऱ्या आणखी एका बाबाचा भांडाफोड; अंधश्रद्धेच्या नावाखाली पैशांची लूट करणाऱ्या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल

नाशिकमध्ये आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

Nashik : भोंदूगिरी करणाऱ्या आणखी एका बाबाचा भांडाफोड; अंधश्रद्धेच्या नावाखाली पैशांची लूट करणाऱ्या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : नाशिकमध्ये आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फडवणूक करून त्यांना पैशांसाठी लुबाडणार्या भोंदू कमलेश अधिकारीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर गुन्हादेखील दाखल झाला आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरातील भोंदू बाबांचे धाबे दणाणले असून एकएक भोंदूंचा भांडाफोड होत आहे. भोंदू कमलेश अधिकारी हा अघोरी पूजा, दैवी तोडगे याच्या नावाखील लोकांची फसवणूक करत होता. भोंदू कमलेश अधिकारीविरोधात इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूरच्या दोन भावांना मृत्यूयोगाची भीती दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आरोप कमलेश अधिकारीवर करण्यात आला आहे. उज्जैनमध्ये स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशूंचा बळी आणि दैवी उपचारांच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे. तसेच मठ बांधण्याच्या बहाण्याने पीडितांची दोन एकर जमीन परस्पर नावावर करून घेतल्याचाही गंभीर आरोप अधिकारीवर असून अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या प्रयत्नांनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या भोंदूबाबत इंदीरानगर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. याबाबत अंनिसचे कृष्ण चांदगुडे आणि पीडित व्यक्ती यांनी माहिती दिली आहे. 

हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरात खळबळ! शिवसेना उपजिल्हाप्रमुखांवर जीवघेणा हल्ला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number