फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, 'सुवार्ता'कार फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन झाले.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, 'सुवार्ता'कार फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मागील अनेक वर्षांपासून ते आजाराशी लढत होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. वसई येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धाराशिव (जुने नाव : उस्मानाबाद) येथील ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भूषवले होते. 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी साडेतीनच्या सुमारास जेलाडी येथील त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. होली स्पिरिट चर्च (नंदाखाल) येथे त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यावर अत्यंसंस्कार संध्याकाळी सहाच्या सुमारास करण्यात येतील. 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी १९७२ मध्ये कॅथलिक धर्मगुरुपदाची शपथ घेतली होती. पालघर ते धार्मिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रातील कामासाठी प्रसिद्ध होते. हरित वसई संरक्षण समितीची त्यांनी स्थापना केली होती. या माध्यमातून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण रक्षण, जतन आणि संवर्धनाचे काम केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number