Mumbai Watermelon Death : कलिंगड खात असाल तर सावधान! कलिंगड खाऊन कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुंबईच्या पायधुनी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पायधुनी येथील एका कुटुंबाने रात्री जेवणात बिर्याणी खाल्ली होती.

Mumbai Watermelon Death : कलिंगड खात असाल तर सावधान! कलिंगड खाऊन कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुंबईच्या पायधुनी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पायधुनी येथील एका कुटुंबाने रात्री जेवणात बिर्याणी खाल्ली होती. त्यानंतर त्यांनी सर्वांनी मिळून कलिंगड देखील खाल्ले होते. मात्र जेवणानंतर कलिंगड खाल्याने विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 13 आणि 16 वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे.

मृत व्यक्तींची नावं ही अब्दुल्ला डोकाडिया वयवर्षे 40, नसरीन डोकाडिया वयवर्षे 35 आणि त्यांच्या मुली आयशा वयवर्षे 16 व झैनब वयवर्षे 13 अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री जेवणात बिर्याणी खाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने अवघ्या काही वेळातच कलिंगड खाल्ले, ज्यामुळे त्यांना उलटी, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान चारही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number