‘माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड अडचणीत’; कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल

माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मधुकर पिचड आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पोटच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पिचड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या सख्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे तसेच सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न पिचड आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला. त्यामुळे […]

‘माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड अडचणीत’; कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल

माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मधुकर पिचड आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पोटच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पिचड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या सख्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे तसेच सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न पिचड आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला. त्यामुळे पिचड यांच्या विरोधात त्यांच्या सुनेने गुन्हा दाखल केला आहे. आपल्या जीवास धोका असल्याची तक्रार करत फिर्यादी सुनेने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पोलीस सुरक्षा मागितली आहे.

नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात मधुकर पिचड यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी कलम ४९८, ३०६, ४०६, ३२४, ५०४, ५०६, ४६८, ४७१ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता मधुकर पिचड यांच्या  अडचणीत आता वाढ झाली आहे.

मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही मधुकर पिचड हे महत्त्वांच्या पदांपासून दूर राहिले. यावेळी त्यांना भाजपकडून कोणते पद मिळाले का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, ‘माझे वय झाले आहे. आता मला काही नको. माझ्या मुलाचा सन्मान म्हणजे माझाही सन्मान’, असे ते म्हणाले. आणि दुसरीकडे पोटच्या मुलालाच आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा त्यांच्यायच सुनेने दाखल केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number