Dinesh karthik : RCB च्या माजी खेळाडूच्या घरी आली लक्ष्मी; जुळ्या मुलांनंतर पुन्हा कन्यारत्न

2021मधील वर्ल्डकप जिंकण्यात मोलाचा वाटा असणारा भारताच माजी खेळाडू दिनेश कार्तिक याच्या घरी नवा पाहूणा आला आहे.

Dinesh karthik : RCB च्या माजी खेळाडूच्या घरी आली लक्ष्मी; जुळ्या मुलांनंतर पुन्हा कन्यारत्न

2021मधील वर्ल्डकप जिंकण्यात मोलाचा वाटा असणारा भारताच माजी खेळाडू दिनेश कार्तिक याच्या घरी नवा पाहूणा आला आहे. दिनेश कार्तिक पुन्हा एकदा बाबा झाला असून त्याला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. दिनशे कार्तिक याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. यावेळी त्याने पोस्टमध्ये म्हटलं की, “हृदयात आशीर्वाद आणि अवर्णनीय कृतज्ञतेसह, आम्ही आमच्या अनमोल मुलीचे या जगात आनंदाने स्वागत करतो. कबीर आणि झियान त्यांच्या लहान बहिणीची ओळख करून देताना खूप उत्सुक आहेत. राहा पल्लीकल कार्तिक प्रेमपूर्वक, दीपिका आणि दिनेश…” दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांनी त्यांच्या लेकीचे नाव ‘राहा’ असे नाव ठेवले आहे. 

हेही वाचा- RCB Playing 11: RCB चा ‘मास्टरप्लॅन’ तयार! विराट कोहलीसोबत 11 कोटींचा धडाकेबाज फलंदाज करणार ओपनिंग?
दिनेश कार्तिकने त्याची पहिली पत्नी निकिता वंजारासोबत 2012 मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर दिनेश कार्तिकच्या आयुष्यात दीपिकाची एन्ट्री झाली. दोघांनी 2013 मध्ये साखरपुडा उरकल्यानंतर 2015 मध्ये दोघंही लग्नबंधनात अडकले. त्यानंतर 2021मध्ये सह वर्षांनी दोघांना जियान आणि कबीर अशी दोन जुळी मुली झाली होतीत. त्यानंतर आता त्यांच्या घरी लक्ष्मी आली आहे. दरम्यान दिनेश कार्तिक याने आयपीएल 2024 नंतर निवृत्ती जाहीर केली होती. आता तो आयपीएलमध्ये आरसीबीच्या कोचिंग स्टाफमध्ये काम पाहत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number