माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. 16 ऑगस्ट 2018 रोजी संध्याकाळी 5.05 वाजता वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या 24 तासांत वाजपेयींची प्रकृती गंभीर झाल्याचे एम्सकडून जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं होतं. दरम्यान केंद्रीय मंत्री […]

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. 16 ऑगस्ट 2018 रोजी संध्याकाळी 5.05 वाजता वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या 24 तासांत वाजपेयींची प्रकृती गंभीर झाल्याचे एम्सकडून जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं होतं.

दरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे सर्वच ज्येष्ठ नेते एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 24 तासांत दोनवेळा वाजपेयींची भेट घेतली होती.

त्यानंतर आज सकळपासून अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

मागच्या 2 महिन्यांपासून वाजपेयींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरु असून किडनीच्या त्रासामुळे त्यांना 11 जूनला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

{loadmodule mod_jux_timeline,Atal Bihari Vajpayee – timeline}

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number