माजी आमदार गुलाबराव पाटील यांचं निधन

अमळनेर, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : अहिराणी भाषेत आमदारकीची शपथ घेणारे खानदेशातील पहिले आमदार, खानदेशची मुलुख मैदानी तोफ, वयोवृद्ध नेते गुलाबराव वामनराव पाटील यांचं निधन झालं. ते 90 वर्षाचे होते. मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधानावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. गुलाबराव पाटील यांना जनता दलाचे आमदार म्हणून 13 वर्ष काम […]

माजी आमदार गुलाबराव पाटील यांचं निधन

अमळनेर, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : अहिराणी भाषेत आमदारकीची शपथ घेणारे खानदेशातील पहिले आमदार, खानदेशची मुलुख मैदानी तोफ, वयोवृद्ध नेते गुलाबराव वामनराव पाटील यांचं निधन झालं. ते 90 वर्षाचे होते. मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधानावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. गुलाबराव पाटील यांना जनता दलाचे आमदार म्हणून 13 वर्ष काम पाहिलं होतं. त्यांच्या निधनाने खानदेशातील जुनं जाणतं नेतृत्व हरपलं आहे. आज दुपारी दोन वाजता अमळनेर तालुक्यातील दहीवद गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गुलाबराव पाटील १९७८ मध्ये पहिल्यांदा अमळनेरमधून आमदार झाले. तीन वेळा आमदार राहिलेल्या गुलाबराव पाटील यांच्यावर साने गुरुजी यांच्या विचारांचा पगडा होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे आमदार म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number