भाजप नेते किरीट सोमैया खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्यास भेटण्यास गेले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप सोमैयांनी केला. तसेच हल्लेखोऱ्यांना अटक करण्याची मागणी सोमैयांनी केली होती. त्यानुसार मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह चार शिवसैनिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली.
किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यात पोहचले तेव्हा त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाले असून शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यावेळी विश्वनाथ महाडेश्वर हेदेखील तेथे उपस्थित होते. त्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
विश्वनाथ महाडेश्वर हे शिवसेना नेते आहेत. तसेच ते मुंबईचे माजी महापौरसुद्धा होते. दरम्यान, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.