मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात कमांडो दलाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले एनएसजीचे माजी महासंचालक जे. के. दत्त यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले आहे. जे. के. दत्त यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मुंबईवर २००८ मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याविरोधात राबवलेल्या ऑपरेशनचे नेतृत्व जे. के. दत्त यांनी केले होते. या ऑपरेशनला ब्लॅक टॉरनॅडो असे नाव देण्यात आले होते. दत्त हे ऑगस्ट २००६ ते २००९ पर्यंत एनएसजीचे महासंचालक होते. एनएसजीमध्ये दाखल होण्यापूर्वी ते सीबीआय विशेष महासंचालक होते. बंगाल कॅडरमधून ते १९७१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांची कार्यशैली खूप लोकप्रिय होती.