पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री गोव्यात

शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची दोन दिवसीय बैठक आज आणि 04 आणि 05 मे गोव्यातील बाणावली येथे होत आहे. यासाठी सकाळी रशियाचे परराष्ट्रमंत्री गोव्यात दाखल झाले त्यानंतर, नुकतेच चीनचे परराष्ट्रमंत्री किन गॅंग आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो गोव्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, गुरूवारी सकाळी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव गोव्यात दाखल झाले आहेत. स्वातंत्र्यापासून भारत आणि पाकिस्ताचे […]

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री गोव्यात

शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची दोन दिवसीय बैठक आज आणि 04 आणि 05 मे गोव्यातील बाणावली येथे होत आहे. यासाठी सकाळी रशियाचे परराष्ट्रमंत्री गोव्यात दाखल झाले त्यानंतर, नुकतेच चीनचे परराष्ट्रमंत्री किन गॅंग आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो गोव्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, गुरूवारी सकाळी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव गोव्यात दाखल झाले आहेत.

स्वातंत्र्यापासून भारत आणि पाकिस्ताचे संबंध नेहमीच खराब राहिलेले आहे. सीमावाद आणि काश्मिर प्रश्नांवरून दोन्ही देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच संघर्ष सुरू असतो. परंतु अनेकदा दोन्ही देशांनी वैर विसरून एकत्र येण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. त्यातच आता पाकिस्तानाचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो-झरदारी हे दोनदिवसीय भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. गोव्यातील पणजीत होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या समिटमध्ये बिलावल भुट्टो सहभागी होणार आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी त्यांना गोव्यातील समिटसाठी आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आता ते पाकिस्तानातून सरकारी विमानाने गोव्यात दाखल झाले आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी गोव्यात येण्यापूर्वी भुत्तो यांनी व्हिडिओद्वारे त्यांच्या भारत दौऱ्याची माहिती दिली आहे. “शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी पाकिस्तान शिष्टमंडळासह मी आज गोवा, भारत येथे जात आहे. SCO बैठकीला आमची उपस्थिती पाकिस्तान या बैठकीला किती महत्व देते हे आधोरेखित करते. संघटनेच्या सदस्य देशांसोबत आम्ही सकारात्मक चर्चेची अपेक्षा करतो.” असे बिलावल भुत्तोंनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो तब्बल 12 वर्षांच्या कालावधीनंतर भारताला भेट देणारे पहिले परराष्ट्रमंत्री ठरणार आहेत. यापूर्वी 2011 मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिनी रब्बानी खार भारत भेटीवर आल्या होत्या. दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर देखील SCO बैठकीसाठी गोव्यात असून गुरुवारी सकाळी त्यांची शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन चे सरचिटणीस झांग मिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली. भारतासाठी SCO अध्यक्षपदासाठी दिलेल्या पाठिंब्याचे यावेळी जयशंकर यांनाी कौतुक केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number