जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भिवंडी शहरातील मदरशामध्ये मटन बिर्याणी खाल्लेल्या 26 मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 13 ते 14 वयोगटातील 26 मुलांना अन्न विषबाधा झालीय.
या सर्वांना इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, यातील पाच मुलांची प्रकृती चिंताजनक झाल्याने सर्वच मुलांना मुंबईच्या नायर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मुलांनी रात्री मटण बिर्याणी खाल्याने त्यांना उलट्या ,पोटात मळमळणे असा त्रास होऊ लागल्याने मदरसामधील शिक्षकांनी मुलांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.