सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

अमरावतीहून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या तब्बल शंभर विद्यार्थांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील आदर्श हायस्कूल येथील हे विद्यार्थी असून दोन दिवसांपूर्वी ते सहलीला गेले होते. शिर्डीत येण्यापूर्वी त्यांचे जेवण झाले. रात्री देवगड येथे मुक्कामी निघाले असताना मुलांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. काही विद्यार्थांना अधिक त्रास होत असल्याने शिक्षकांनी सर्व […]

सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

अमरावतीहून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या तब्बल शंभर विद्यार्थांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील आदर्श हायस्कूल येथील हे विद्यार्थी असून दोन दिवसांपूर्वी ते सहलीला गेले होते. शिर्डीत येण्यापूर्वी त्यांचे जेवण झाले. रात्री देवगड येथे मुक्कामी निघाले असताना मुलांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. काही विद्यार्थांना अधिक त्रास होत असल्याने शिक्षकांनी सर्व मुलांना रात्री शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. खबरदारी म्हणून रुग्णालयाने सर्व विद्यार्थांना देखरेखी खाली ठेवले आहे.

सहलीत २२७ विद्यार्थी असून यातील शंभर मुलांना त्रास झाला तर काही शिक्षकांना देखिल विषबाधेसारखी लक्षण जाणवल्याने त्यांनाही उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत डाॅ. प्रितम वडगावे यांनी माहिती दिली आहे. रात्री अकरा वाजता शिर्डीतील रूग्णालयात विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची डाॅक्टरांची माहीती दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number