जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी
पिंपरीमध्ये लग्नसोहळ्यात जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.
लग्नसोहळ्यात सामील झालेल्या 14 जणांना भोजनाच्यावेळी बासुंदी खाल्यानंतर विषबाधा झालीये.
यात 4 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडच्या रावेतमध्ये हा लग्नसोहळा होता.
या लग्नात बासुंदी खाल्ल्यानंतर या सर्वांना उलटी, जुलाब, डोकेदुखी आणि चक्करचा त्रास सुरू झाला. तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.