समोसा झाला, वडापाव झाला आता गोकुळ दुधात आढळल्या पांढऱ्या अळ्या तर आता शीतपेयाच्या बाटलीत प्लॅस्टिकची पिशवी आढळून आल्याची घटना घडली आहे.
अंबरनाथ – डोंबिवली मध्ये दुधामध्ये आळी सापडल्यानंतर आता अंबरनाथ शीतपेयाच्या बाटलीत प्लॅस्टिकची पिशवी सापडली आहे. अंबरनाथमध्ये राहणारे अनुराज आपल्या मित्रांसोबत शहराच्या पश्चिम भागात असलेल्या एका धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते, तिथे जेवण झाल्यावर त्यांनी ‘थम्सअप’ची ऑर्डर केली. धाब्यावर असलेल्या कामगाराने त्यांना ‘थम्सअप’ आणून दिले. ही बाटली उघडत असतानाच थम्सअपच्या गॅस सोबतच बाटलीच्या आतमध्ये असलेली प्लास्टिकची पिशवी वर आल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांनी बाटलीची माहिती मालकाला दिली. या प्रकाराबाबत शीतपेय पुरविणाऱ्या एजन्सीशी संपर्क साधला असता ही आपली जबाबदारी नसल्याचं सांगून त्यांनी हात वर केले.
यापूर्वी डोंबिवली येथील रहिवासी सुशील जाधव यांनी स्पेशल दूध आणलं आसता त्यातुन पांढऱ्या आळ्या बाहेर आल्या होत्या. याबाबत दुकानदार आणि डीलरकडे तक्रार दाखल करण्यात आली. मात्र आद्यप ते पाहणी करायला आले नाहीत. यापूर्वी सुद्धा वडापाव मध्ये पाल सापडली होती. त्यामुळे आता फूड डिपार्टमेंट याकडे लक्ष देईल का हे पाहावे लागेल.