जळगाव : अमेरिका – इराण यांच्यामध्ये शांतता करार झाल्यानंतर सोने चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोने – चांदीचे दर आज पुन्हा घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज, गुरुवारी सोन्याच्या दरात 4 हजार 500 तर चांदीच्या दरात 13 हजार रूपयांची घसरण झाली आहे. रुपयाच्या तुलनेत अमेरिकन बँकांचे व्याजदर धोरण, डॉलर मजबूत झाला असून, गुंतवणूकदार यांनी केलेली प्रॉफिट बुकिंग आणि पॉलिटिकल टेन्शन या विविध कारणांमुळे सोने-चांदीच्या दरात ही घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव जीएसटीसह 1 लाख 49 हजार आहे, तर चांदीचे भाव जीएसटीसह 2 लाख 44 हजार रुपयांवर जाऊन पोहोचला असून आगामी काळात देखील सोने – चांदीच्या दरात आणखी घसरण होऊ शकते, असा अंदाज सोने व्यावसायिक यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात सोने तज्ञ गिरीश डेरे यांच्यासोबत जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी संवाद साधला आहे.