Traffic Jam Toward Mumbai : एसटी बस फुल… महामार्गावर गाड्यांच्या रांगा… प्रचंड वाहतूक कोंडी; बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणवासी मुंबईच्या दिशेने निघाले

अजेश नाडकर / योगेश बांडागळे / प्रकाश शिंदे, प्रतिनिधी  रायगड : पाच दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन करून कोकणवासीय आता पुणे आणि मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग येथून कोकणवासी मुंबईच्या दिशेने येत असून याकरता बस, खासगी गाडीचा वापर होत आहे. रायगडमधील एसटी स्थानक पहाटेपासूनच प्रवाशांनी गजबजले आहे. खासगी वाहनांसोबतच सर्वसामान्य प्रवाशांची पहिली पसंती असलेल्या एस टी  स्थानकांवर प्रवाशांची […]

Traffic Jam Toward Mumbai : एसटी बस फुल… महामार्गावर गाड्यांच्या रांगा… प्रचंड वाहतूक कोंडी; बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणवासी मुंबईच्या दिशेने निघाले

अजेश नाडकर / योगेश बांडागळे / प्रकाश शिंदे, प्रतिनिधी 

रायगड : पाच दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन करून कोकणवासीय आता पुणे आणि मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग येथून कोकणवासी मुंबईच्या दिशेने येत असून याकरता बस, खासगी गाडीचा वापर होत आहे. रायगडमधील एसटी स्थानक पहाटेपासूनच प्रवाशांनी गजबजले आहे. खासगी वाहनांसोबतच सर्वसामान्य प्रवाशांची पहिली पसंती असलेल्या एस टी  स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पहायला मिळत आहे. मुंबई आणि पनवेलकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठ्या रांगा पहायला मिळत आहेत. मुंबई – गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या असून माणगावजवळ 4 ते 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. माणगाव इंदापूर हे वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जाते. दरम्यान, महामार्गावर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परतीचा प्रवास सुखकर करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न दिसत असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलीस करत आहेत. 

हेही वाचा : Nila Vikhe Patil: स्वीडनच्या संसदेत घुमणार महाराष्ट्राचा आवाज! विखे-पाटलांची कन्या 'रिक्सदाग'मध्ये खासदार

तसेच रत्नागिरीतील कोकणवासीयदेखील मुंबईकडे परतीच्या प्रवासाला लागले असून त्याचा मोठा फटका मुंबई-गोवा महामार्गाला बसताना दिसत आहे. आज सकाळपासून चिपळूण परिसरात महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. परशुराम घाटात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या असून, वाहनांचा वेग मंदावला आहे. तर बहादूरशेख नाका परिसरात पुलाचं काम रखडल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर उतरल्याने महामार्गावर वाहनांचा ताण वाढला आहे.

पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी

पुणे-सातारा महामार्गावरही आज सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटासह शिवापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी पोलीस वाहतूक नियंत्रित करत गणेशभक्तांना सहकार्य करताना दिसत आहेत. गणेश विसर्जनानंतर कोकणातून पुणे-मुंबईकडे परतणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुणे-सातारा महामार्गावर पुढील दोन दिवसही वाहतुकीचा ताण कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी संयम बाळगून पोलिसांच्या सूचनांचे पालन करत प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number