‘नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर द्या’

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सायंकाळी आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोना आणि एचएन २ इन्फ्लूएंझा व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, विमान वाहतूक […]

‘नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर द्या’

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सायंकाळी आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोना आणि एचएन २ इन्फ्लूएंझा व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, आरोग्य सचिव राजेश भूषण, आयसीएमआरचे राजीव बहल, नीती आयोगाचे व्ही के पॉल आणि इतर उपस्थित होते.

रूग्ण, आरोग्य व्यावसायिक आणि आरोग्य कर्मचारी या सर्वांनी, रुग्णालयाच्या आवारात मास्क घालण्यासह कोविड योग्य वर्तनाचं पालन करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेले रुग्ण गर्दीच्या ठिकाणी वावरत असताना, त्यांनी आणि सर्वांनी मास्क घालणं उपयुक्त आहे असही पंतप्रधानांनी यावेळी ठामपणे सांगितलं.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूची ११३४ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या (उपचार सुरू असलेले रुग्ण) ७०२६ वर पोहोचली आहे. सकाळी आठ वाजता जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, संसर्गामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५,३०,८१३ झाली आहे. मंगळवारी कोरोना विषाणू संसर्गाची ६९९ नवीन प्रकरणे समोर आली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number