राज ठाकरे यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘गोदापार्क’ला महापुराचा फटका!

मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला. नाशिकवरून सोडलेल्या पाण्याने वैजापूर व गंगापूर तालुक्यातील 17 गावांना पुराचा फटका बसलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘गोदापार्क’ला सुद्धा महापुराचा फटका बसलाय. नाशिकच्या गोदावरीला आलेल्या महापुरात गोदापार्क मध्ये असलेल्या अनेक वस्तू वाहून गेल्या आहेत.  गोदापार्कचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काय आहे गोदा पार्क? नाशिक महापालिकेत मनसेची […]

राज ठाकरे यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘गोदापार्क’ला महापुराचा फटका!

मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला. नाशिकवरून सोडलेल्या पाण्याने वैजापूर व गंगापूर तालुक्यातील 17 गावांना पुराचा फटका बसलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘गोदापार्क’ला सुद्धा महापुराचा फटका बसलाय. नाशिकच्या गोदावरीला आलेल्या महापुरात गोदापार्क मध्ये असलेल्या अनेक वस्तू वाहून गेल्या आहेत.  गोदापार्कचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

काय आहे गोदा पार्क?

नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना राज ठाकरे यांनी या गोदापार्कची निर्मिती केली होती.

गोदावरी नदीच्या बाजूला नाशिकच्या नागरिकांना फेरफटका मारता यावा, यासाठी गोदापार्क तयार करण्यात आला होता.

नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे भव्य गोदापार्क निर्माण झालं होतं.

नाशिकमध्ये 1 किलोमीटर परिसरात सात ते आठ कोटी रूपये खर्चून गोदा पार्कची निर्मिती केली होती.

गंगापूर गाव ते होळकर पुलापर्यंतच्या भागात गोदा पार्क उभं राहिलं होतं.

 

मात्र, गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे गोदापार्कमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे संपूर्ण गोदापार्कमध्ये गाळ साचत अनेक वस्तू या पुरात वाहून गेल्या. तसंच याठिकाणी असलेलं झाड आणि खांबदेखील उन्मळून पडले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number