भिवंडीत वाहतूक पोलिसांची फ्लॅश डिप्लॉयमेंट मोहीम

भिवंडीत वाहतूक नियमांची सदैव पायमल्ली केली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी, भरधाव वाहन चालविल्याने अपघातांच्या घटना वाढत असताना गुरुवारी सायंकाळी अचानक भिवंडी शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या फ्लॅश डिप्लॉयमेंट मोहीमेमध्ये शहरातील विविध चौकाचौकात एकाचवेळी उतरलेल्या वाहतूक पोलिसांनी अवघ्या दोन तासात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ६०७ वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा अंतर्गत विना हेल्मेट, विना सीट […]

भिवंडीत वाहतूक पोलिसांची फ्लॅश डिप्लॉयमेंट मोहीम

भिवंडीत वाहतूक नियमांची सदैव पायमल्ली केली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी, भरधाव वाहन चालविल्याने अपघातांच्या घटना वाढत असताना गुरुवारी सायंकाळी अचानक भिवंडी शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या फ्लॅश डिप्लॉयमेंट मोहीमेमध्ये शहरातील विविध चौकाचौकात एकाचवेळी उतरलेल्या वाहतूक पोलिसांनी अवघ्या दोन तासात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ६०७ वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा अंतर्गत विना हेल्मेट, विना सीट बेल्ट, ट्रिपल सीट , रिक्षांमधील ओव्हर सिट, फ्रन्ट सिट, तसेच इतर कलमान्वये कारवाई करीत त्यांच्या जवळून २ लाख २३ हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती भिवंडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष पाटील यांनी दिली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करतानाच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना वाहतूक नियंमांचे फलक दाखवून जनजागृती करण्यात आली.या विशेष मोहिमेत कोनगाव,नारपोली,भिवंडी उपविभागातील एकूण ६ अधिकारी व २५ सहभागी झाले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number