मुरूड-जंजिरा किल्ल्यावर फडकला कायमस्वरूपी तिरंगा

सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने मुरुड जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी तिरंगा फडकवण्याची मागणी करण्यात आली होती. भारतीय पुरातत्व विभागाने किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवण्यास मंजुरी दिली, त्यानंतर मुरुड जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी तिरंगा फडकवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला खासदार छत्रपती संभाजीराजे, कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, […]

मुरूड-जंजिरा किल्ल्यावर फडकला कायमस्वरूपी तिरंगा

सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने मुरुड जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी तिरंगा फडकवण्याची मागणी करण्यात आली होती.

भारतीय पुरातत्व विभागाने किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवण्यास मंजुरी दिली, त्यानंतर मुरुड जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी तिरंगा फडकवण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला खासदार छत्रपती संभाजीराजे, कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, पुरातत्व मुख्य अधिकारी बीपिनचंद्र नेगे, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी उपस्थिती लावली होती.

भारतीय सागरी दुर्गांच्या इतिहासातील अभेद्य किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरुड येथील जंजिरा किल्ल्यावर आता कायमस्वरूपी तिरंगा पाहायला मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number