उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये ध्वजारोहण

भारताच्या ७७ व्या स्वातंत्रदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये ध्वजारोहण केले. फडणवीस यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना आणि वीर जवानांना अभिवादन केले. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या वर्षी हर घर तिरंगा ही घोषणा दिली. यानंतर प्रत्येक भारतीयाने स्वतःच्या घरी तिरंगा फडकवण्यास सुरुवात केली. […]

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये ध्वजारोहण

भारताच्या ७७ व्या स्वातंत्रदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये ध्वजारोहण केले. फडणवीस यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना आणि वीर जवानांना अभिवादन केले. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या वर्षी हर घर तिरंगा ही घोषणा दिली. यानंतर प्रत्येक भारतीयाने स्वतःच्या घरी तिरंगा फडकवण्यास सुरुवात केली. यंदाच्या वर्षी घरोघरी तिरंगा दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी यंदा मेरी माटी मेरा देश हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे महत्त्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प अंतिम टप्प्यात
गडचिरोलीत स्टीलसाठी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
विदर्भातल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन
भटक्या विमुक्तांना मोदी आवास योजनेतून घर देण्याला प्राधान्य
शेतकऱ्यांना मागाल तेव्हा कृषी क्षेत्राशी संबंधित साधनांच्या स्वरुपात शासकीय मदत
शेतकऱ्यांना मदत
प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सुरू
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात विकास सुरू
समृद्धी महामार्गामुळे विदर्भ हे देशाच्या मालवाहतुकीचे केंद्र

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number