देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये, संस्था, दिल्लीतील लाल किल्ला येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले असून यावेळी राष्ट्रगीत झाल्यानंतर लाल किल्ला परिसरात हेलिकॉप्टरच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील महत्त्वाचे नेते आणि परदेशी पाहुणेदेखील उपस्थित आहेत.
लाल किल्ल्यावर पोहोचण्याआधी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. तर, पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरुनही देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशवासियों को #स्वतंत्रतादिवस की हार्दिक शुभकामनाएं। जय हिंद! Greetings on this very special Independence Day. Jai Hind! #Iday2022 — Narendra Modi (@narendramodi) August 15, 2022